मोठ्या धरणात पाण्याची आवक; जायकवाडी धरणात सर्वाधिक

Foto
मराठवाड्यातील 11 पैकी तब्बल 8 मोठ्या धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली असून जायकवाडी धरणात सर्वाधिक 93 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे. जून महिन्यातच धरणात पाण्याची आवक सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षात प्रथमच जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली. तर मान्सूनही वेळेवर दाखल झाल्याने मराठवाडाभर जोरदार पाऊस बरसला. जून महिन्यात चांगला पाऊस पडण्याची ही गेल्या पाच वर्षातील पहिलीच वेळ. या पावसाने मराठवाड्यातील मोठ्या धरणात पाण्याची आवक सुरू झाली. अकरा मोठ्या धरणांपैकी जायकवाडी धरणात आतापर्यंत सर्वाधिक 93 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्याखालोखाल पेनगंगा प्रकल्प 50 दलघमी, निम्न दुधना 22, माजलगाव 15, येलदरी 13 सिद्धेश्वर 11, विष्णुपुरी 8 तर मांजरा धरणात 2 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. 
जायकवाडी धरणात 37 टक्के पाणीसाठा 
धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने जायकवाडी धरणात दोन आठवड्यांपासून पाण्याची आवक सुरू झाली आहे. वरच्या भागातील छोटे प्रकल्प तसेच कॅनल मध्ये पाणी असल्याने पाऊस झाला की आवक सुरू होते. जायकवाडी धरणाची सध्याची पाणी पातळी 459 मीटर असून 37 टक्के पाणीसाठा आहे. येलदरी धरणात 60 टक्के पाणीसाठा, मनार धरणात 45 टक्के, प्रेनगंगा 37, विष्णुपुरी 33, सिद्धेश्वर 25 माजलगाव 21, मांजरा 16 तर खडका बंधार्‍यात 41 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker